Archive for जनवरी, 2007

माझा न्युनगंड !

प्रसाद नागेश घाडी – १८ वर्षे वयाचा – इरिव्हर्सीबल मस्कुलर ऍट्रोफी / डायस्ट्रोफी (मराठीतले नांव सोडा – मला उच्चारही माहीत नाही !) ह्या दुर्धर आजाराने व्यस्त झालेल्या एका अश्राप जीवाची कथा आज रात्री ११ ते ११.३० च्या मध्ये सह्याद्री वाहिनीवर बघीतली व त्याच्या बद्दल आपणांस चार शब्द कळवल्या खेरीज राहवले नाही.

p1904200151.jpgह्याला मी सर्वप्रथम बघीतला तो “आता खेळा नाचा ” ह्या नक्षत्रांचे देणे ह्या कार्यक्रमात मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात. त्या वेळी त्याचे वय असावे १४/१५- परंतू आज त्याला परत बघताना ह्या मुलाने माझ्यातला ‘मी’ पणाचा नक्षा साफ उतरवून टाकला.
दहावीच्या परिक्षेत (आपल्या विरूद्ध असलेल्या सर्वच परिस्थितींत) ८६% गुण मिळवणे हे मलाही माझ्या वेळी शक्य झाले नव्हते.

“दहावीचे वर्ष मला फार कठीण गेले, पुस्तक सारखे हातातून गळून पडायचे. मी खुप आजारी पडलो, तरी त्याही परिस्थितींत मी मन लावून अभ्यास केला” हे वाक्य वाचून मला ज्या सुविधा मिळाल्या व ज्या परिस्थितींत मी दहावी पास केली त्याची आठवण झाली.

२००० चा नेहरू राष्ट्रीय बालश्री पुरस्कार, राजीव गांधी ऍवार्ड, चैतन्य आर्टचा पुरस्कार, केव्हीन केअर ऍबीलीटी पुरस्कार हे व असे अनेक पुरस्कार प्राप्त हा मुलगा काय करू शकत नाही ते विचारा.
प्रसादचे गाणे मी प्रत्यक्ष ऐकलेच होते, संपूर्ण शरिरातली शक्ती हातात एकवटून तो चित्रेही काढतो, बुद्धीबळ खेळतो व कविता करतो. त्याच्या चित्रांचे भेटकार्ड बाजारात आल्याचे पाहून समाधान वाटले. कृणाल कॅसेट्स च्या श्री. विरा ह्यांनी त्याच्या गाण्यांची कॅसेटही काढली आहे.
प्रसादचे वडिल श्री. नागेश घाडी हे एका म.न.पा.च्या इस्पितळात सुरक्षा रक्षक असल्याचे वाचनांत आले होते. आई सौ. शरयु घाडी ह्या पण नोकरी करतात.
“आम्हीच त्याचा उत्कृष्ठ सांभाळ करू ह्याची खात्री असल्यानेच देवाने त्याला माझ्या पोटी जन्म घातला असावा. मी त्याची आई आहे ह्याचा मला अभिमान वाटतो” ह्या शब्दांत त्यांनी स्वतःचे मनोगत सांगीतले.

“माझ्या यशातला १०% वाटा माझा तर ९०% वाटा माझ्या आई-वडिलांचा आहे” हे तो इतक्या विनम्रपणे सांगतो की आपला उर भरून येईल.
प्रसाद बद्दल श्री. परेश मोकाशींनी एक सुरेख उदाहरण दिले – अदिती ह्या देवतेच्या आठ पुत्रांपैकी प्रथम सात पुत्र धडधाकट होते परंतू आठवा पूत्र कमकुवत होता, परंतू तोच सुर्य झाला.
“माझ्या सारख्या इतर मुलांच्या आई-वडिलांना माझा हाच संदेश आहे की, मी कठीण परिस्थिंशी सामना करून जे करू शकतो ते काही अपंग मुले कदाचीत करणार नाही परंतू त्यांना त्याचा प्रयत्न केल्याचा खरा आनंद लाभु द्यावा” असा संदेश त्याने दिला.
कुमार केतकर म्हणतात ते खरे आहे, “आपल्या सारख्याला न्युनगंड वाटावा असे प्रसादचे चरित्र आहे” 

धिरोदत्त प्रसाद घाडीला त्याच्या भावी जीवनांत सर्व परिस्थितींशी धडधाकट मनोवृत्तीने तोंड देण्यासाठी अनेक शुभेच्छा !
  

टिप्पणी करे

बालगीत-चिमणी

गरीब बिचाऱ्या चिमणीला,                                             
सगळे टपले छळण्याला,                                        
चिमणीला मग राघू बोले,                                                   
का गं तुझे डोळे ओले ?         

eurasian_tree_sparrow1.jpg                                             

काऽऽय सांगू बाबा तुला,
एकटे पणा छळतो मला !
राघू होता हुशार फार,
त्याने दिले सल्ले चार !

“झाडां वरती फिरून यावे,
गाणे गोड गावून यावे.
बाजूला मग जाऊन यावे,
गप्पा टप्पा मारून यावे,”

राघूच्या सल्ल्याने चिऊताई खूश झाली- खालच्या साळूबाईंशी गप्पा मारायला गेली.

साळू बाई, साळू बाई;
कसली तुमची नेहमीच घाई ?
शेजारी जरा बसाहो ताई,
तक्रार माझी फार नाही.

नाही गं बाई, चिऊताई,
बसायला मला वेळच नाही,
शाळेची तयारी करायची घाई,
त्यातच छोटूचा गणवेश नाही,

वह्या पुस्तके आणायची बाकी
कव्हर्स त्यांना घालायची खाकी
होतील आता पिल्ले गोळा,
करते हं मी त्यांच्या पोळ्या.

चिमणी ती मग हिरमुसली
झाडा वर जाऊन बसली
तिकडून आला चिमणा छान
होता तो खूप गोरा पान.

 housesparrow1.jpg

येते का गं फिरायला,
गोड गाणी म्हणायला.
झाडांवरती फिरून येऊ
गोड गाणी गाऊन येऊ.

चिमणी आमची खुशीत आली                                  
गाणे गोड गाऊ लागली
झाडां वरती फिरू लागली,
चिमण्या संगे भुर्र उडाली.

टिप्पणी करे

चला होड्या बनवूया का ?

पावसाळा सुरू झाला आहे ….. धो धो…. धुवाँधार पा‌ऊस कोसळायला लागलाय….
आमच्या मुंब‌ईत हातभर अंतरावरचे दीसत नाही इतका पा‌ऊस जोरात येतो….
अगदी बॉक्सींग केल्यासारखे दणादण बडवतो….
linkroad71.jpg
पुण्यातला घाटावरचा पा‌ऊस आळशी…. ये‌ईल तो शंका काढीत काढीत आला की व्हि.आय.पी. पाहुण्यासारखा उगीचच जायची वेळ घड्याळात बघत राहील !

सुरूवातीला काय अप्रूप असायचे ह्या पावसाळ्याचे ! बालपणी शाळा नुकत्याच सुरू झाल्यावर येणारा पा‌ऊस म्हणजे देवदूतच वाटायचामे महिन्याची सुट्टी नुकतीच संपलेली असताना शरिरावर बुद्धीवर सुट्टीचा कैफ बाकी असतानाच हा तुफान गर्जना करीत यायचा….
पहिल्या पावसांत घामोळ्या जातातह्या समजुतीने मग उघडे नागडे तोकड्या चड्डीवरहेऽऽऽहेऽऽऽऽहेऽऽऽऽकरीत कार्टी रस्त्यावर धावायची…. ओली चिंब व्हायची पोरं !
पण घरून पूर्ण सूट असायची त्या गम्माडी जमतीला ! छोटी छोटी तळी साचायची रस्त्यात मग छप्प छप्प करीत दोन्ही पाय एकावेळी ढुंगणावर आपटत त्या तळ्यांत उड्या मारून आजूबाजूला पाणी उडवायचो आम्ही….
ती जाहिरात आठवते का टिव्ही वरची
एक छोट्टासा बालक असाच उड्या मारत असतांना एक धोती घातलेला जरासा रागीट पणउत्पल दत्तसारखा खोडसाळ म्हातारा रस्त्यावरून जाताना त्याच्या अंगावर पाणी उडते तो भडकण्याच्या बेतातच असतो पण……….. त्यालाही स्वतःचे बालपण आठवतेअगदी समर्पक जाहिरात होती ती……
लहान मुले पावसांत हुंदडणारे असे प्रसंग पाहिले की, बालपण उन्मळून आठवते डोळ्यांच्या कडा ओलसर होतात…. त्या आठवांनी !
ह्या पावसात मग ओढा बनला की कागदी होड्या फटाफट तयार व्हायच्या. माझी मोठी बहिण कागदी नांवा बनवण्यात पटाईत !
साधी होडी , बंब होडी , नांगर वाली होडी, चार खणी होडी वगैरे पटापट बनवून द्यायची….
मग मागच्या वर्षीची वह्यांची रद्दी फार उपयोगी पडायची…..
                                                                                                               image221.jpg
तिर्थरूप रेल्वेत होतेत्यांची ऑफिसच्या जुन्या पुराण्या रजिस्टर्स वर पटकन हक्क सांगितला जायचा……
एकदा ते घरी नसताना नेमका पाऊस आला…..टराटर दोन चार पाने फाटली…… फटाफट होड्या तयार झाल्या. मी पळालो पण होड्या पाण्यात सोडायलावेळेचे भान कसले उरते ?तिर्थरूप घरी आल्यानंतर आमचे आगमन उशिराने झाले त्यातही चिखलात लोळून, कपड्यांचा चपलांचा बोऱ्या वाजवून – पाहण्यालायक अवतारात घरी दर्शनार्थ पोहचलो….
घरी जाऊन पाहतो तर काय…. सिन एकदम सिरीयस !!!
दोघी बहिणी पुस्तकांत डोकी खुपसून बसलेल्या…..
मोठी फुसफुस् करीत नांक ओढीत होती…….
मलाम्हणजे ताकभातपापडलोचणे लगेच कळायचे पण आज नेमके काय चुकले ह्याचा अंदाज येत नव्हता
म्हटले काढली असेल एकीने दुसरीची खोडी खाल्ला असेल मार मोठीने…..
म्हणून चुपचाप स्लिपर्स हातात उचलून मागच्या अंगणात सूबाल्या करायची पोझ घेतलीच…. तेव्हढ्यात साहेबांचा पंजा पडला मानगुटीवर….. सटासट आवाज सुरू झाले
माझी नेहमी ट्रिक असायची ती जोर-जोरांत रडण्याची म्हणजे खालून-तळघरांतून आजोबांची हाक यायला पाहिजे  “दाऽऽऽदाऽऽऽऽऽकरून
कसले काय…. आज आवाज फक्त सटासटचाच मोठा होता.
त्या दिवशी पूर्ण गल्लीने माझ्या तोंडच्या आवाजापेक्षा अंगाचा आवाज मोठा आलेला ऐकला……
मी रात्री जेवताच रडत रडत झोपलोमहान आश्चर्यकाका, आत्या, आई, आजोबा, आजी पैकी कुणीच जवळ घेतले नाही त्या दिवशी……
नंतर हळूहळू उलगडा होत गेला
तिर्थरूपांचे ऑफिसच्या कामाचे रजिस्टर गटारात होड्या बनून फिरतं होते…..
त्याला कारणीभूत मी मला होड्या बनवून देणारी माझी ताई
आम्ही दोघांनी मुंबईतल्या पावसाच्याच लयीतच मार खाल्लेला होता…..
आत्या आई मध्ये पडली म्हणून त्यांना ओरडा ऐकावा लागलेला होता….
आजी साळसुदासारखी हळूच भजनाला जाते करून सटकलेली होती (इथे माझे टाळ कुटले गेले होते) आजोबाही तळ घरात गप्पवर आलेच नाहीत कारण त्यांना माहित होते की गुन्हा काय घडला ते !
रात्री उशीराने जरा स्वप्न आल्यासारखे वाटले…… दादा उश्यांशी बसून डोक्यावरून हात फिरवीत आहेत असे काहीसे पण डोळे उघडून खात्री करायचा त्राणही शिल्लक नव्हता अंगात…..  
                                                       101.jpg
कॉलेजला जायला लागल्यावर एकदा पावसाळ्यात काकांचा किरण आला….
“भाई
होडी बनवून दे ना !” मी सुन्न;  कागदाकडे नेलेला हात चटका लागतो तसा मागे घेतलाशेजारी दादा कसलेसे वाचन करीत होते…. चष्म्यांच्या आडून त्यांनी हळूच पाहिल्याचा भास झाला मला…..
मी गप्प पाहून दादाच बोलले. “आण मी देतो बनवून”  थोड्याश्या अनिच्छेने किरण त्यांच्याकडे वळला.
कागद कामाचे नाही ना ?” ह्या वाक्यावर मी का कुणास ठाऊक सिन मधून एक्सीट घेतली.

हंम्म्, त्याला होडी बनवून देत आहेत !” मी आई कडे स्वयंपाक खोलीत जाऊन धूसफूसलो
मला होडीवरून लहानपणी दिलेला मार विसरले !”
मला
वाटले आई आता आपल्या बाजूने काहीतरी खूसपूसेल….
पण तीने एक सेकंद हातातले काम थांबवून माझ्याकडे तिऱ्हाईत नजरेने पाहिले  व म्हणाली….
तुला मार आठवतो…. मला ते रात्रभर तुझ्या विजुच्या उशाशी बसलेले आठवतात !!! ” –

Comments (1)

“आनंद~यशवंत”- वृत्तांत

मराठी गीत व संगीतकार श्री.यशवंत देव ह्यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त हृदयेश आर्ट्स तर्फे त्यांचा हृद्य सत्कार समारंभ शनिवार-१९नोव्हे. रोजी पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात संपन्न झाला – त्याचा हा वृत्तांत.

श्री. प्रदीप भिडे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन ठीक ८ वा. सुरू करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

तनुजा वैद्य-जोग ह्या श्री.देवांच्याच शिष्येने ‘तुळशीच्या बनी’ ह्या देवांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तिगीताने सुरुवात करीत ‘तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट’ हे भावगीत पाठोपाठ सादर केले. मंगेश पाडगावकरांच्या नव्या कोऱ्या येऊ घातलेल्या काही भावगीतांपैकी ‘सांग कुठे भुलला ग राधे तुझा श्याम’ ह्या गीताने तनुजा वैद्य जोगांनी ह्या कार्यक्रमातील स्वतःच्या सहभागाची सांगता केली.

तत्पुर्वी श्री. भिडे ह्यांनी श्री.यशवंत देवांनी प्रचलित केलेल्या “समस्वरी” ह्या गीत प्रकाराबद्दल गमतीदार माहिती सांगितली. ‘सांग कुठे भुलला’ च्या आधी तनुजा ह्यांनी “समस्वरी” प्रकारातले एक गीत सादर केले. हिंदीतल्या “जवाँ है मुहोब्बत-” च्या चालीवर मराठीत “मी जाते माहेरी, गुंडाळून गाशा. नको ती भांडणे, नको तो तमाशा” हे गीत सादर करताच सभागृहात हास्याचा धबधबा कोसळला.

मी इयत्ता ७वीत असताना गिरगांवच्या देशस्थ यजुर्वेदी माध्यांदीन ब्राह्मण सभेच्या सभागृहात श्री. यशवंत देवांनी सादर केलेल्या मराठी “समस्वरी” ची आठवण प्रकर्षाने आली.
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” वरील समस्वरी त्यांनी “चौपाटीच्या बाकावरती वचन दिले तू मला” असे केल्याचे मला अजूनही आठवते. 

जवळपास १५०० गीतांना चाली देऊन संगीतबद्ध करणाऱ्या श्री.यशवंत देवांबद्दल बोलताना भिडे कौतुकाने (नारदाची गोष्ट संगत) म्हणाले की, मुंबईतल्या शिवाजी पार्कचे हे देव यशवंतही आहेत व आनंदही आहेत.

पाठोपाठ माधुरी करमरकर ह्यांनी रसिक मनाचा ताबा घेतला तो देवांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘जीवनांतली घडी अशीच राहू दे’ ह्या आजवरच्या लोकप्रिय गीताने. ‘विसरशील खास मला’ ह्या त्यांच्याचं गीताला मिळालेला श्रोत्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त होता. माधुरी ह्यांनीही “समस्वरी” ह्या प्रकारातले देवांचे “ओह सजना, बरखा बहार आयी” वरील “ही बघ ना नटून थटून सांज आली” हे गीतही रसिक वर्गाची वाहवा घेऊन गेले.
माझे आवडते कवी श्री. मंगेश पाडगावकर ह्यांची खास उपस्थिती मनाला सुखावून गेली. त्यांनी श्री.देवांच्या गौरवापर छोटेखानी भाषण केले.श्री. यशवंत देवांनी त्यांच्या कित्येक गीतांना चाली दिल्या व ती गीते अजरामर झाली ह्याची आठवण करीत देवांच्या १००व्या वाढदिवसाचा कार्यक्रम येथेच पार पडो व मी व आपण रसिक वर्ग त्या कार्यक्रमाला उपस्थित राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. फक्त “आनंद यशवंत” हे नाव असलेल्या ह्या कार्यक्रमातला “देव” हरवू देऊ नका- असेही त्यांनी यशवंत देवांना सुचविले.निर्व्यसनी देवांचे कौतुक करताना ” हा असा संगीतकार आहे जो दारू पीत नाही, सिगरेट ओढत नाही व तंबाखू खात नाही” हे आवर्जून सांगितले.

“प्रेम करणाऱ्याने प्रेम कधी तराजूत तोलू नये व गायनाच्या कार्यक्रमात भाषण देणाऱ्याने जास्त बोलू नये.” असे सांगत त्यांनी भाषणाची पूर्तता तर केली पण जाण्यापूर्वी त्यांनी-

“मी आज ७५ वर्षांचा, देव आज ८० वर्षांचे तर श्री.गजानन वाटवे (उपस्थित होते) आज ९० वर्षांचे आहोत. आमचे सत्कार समारंभ होत असताना आम्ही थरथर कापत कोणाच्या तरी हातांचा आधार घेत मंचावर येतो त्याचा अर्थ आमची प्रतिभा, आमची गायकी वा आमची मराठी कोणाच्या आधाराने चालणार किंवा पुढे सरकणार असा घेऊ नये” हे सुनावताच श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. ” ही मराठी आपल्या स्वत:च्या पायावर उभी राहणारी आहे व तिला कुठल्याही हाताची गरज नाही” हे टाळ्यांच्या गजर संपल्यावरचे वाक्य अधिक टाळ्या घेऊन गेले.
श्रोतवृंद श्री. पाडगावकरांच्या बोलांत मंत्रमुग्ध असतानाच श्री.श्रीधर फडके ह्यांनी मंचाचा ताबा घेतला – स्पष्ट व साध्या मराठीत “नमस्कार” असे रसिकांना वंदन करीत त्यांनी “देव काकांना मी घरातल्या समोरच्या खिडकीत बसून वहीत काहीतरी लिहिताना बघत असे”.”त्यांची मला खूप भीती वाटे” “त्यांनीच मला सर्वप्रथम गाण्याची संधी दिली व तू सुधिर फडकेंचा मुलगा आहेस हे लक्षात ठेवून गाणे गा असेही बजावले” ह्या व अशा कित्येक आठवणी श्री.देवांबद्दल सांगितल्या.

कै. सुधीर फडके (बाबूजी) ह्या माझ्या आवडत्या गायकाचे गाणे प्रत्यक्ष बघण्याचे सौभाग्य मला कधी लाभलेच नाही परंतू श्रीधर फडकेंनी हुबेहूब त्यांच्याचं आवाजात जी गाणी सादर केली त्यांतूनच माझी दुधाची तहान मी ताकावर निभावून नेली.

मग सुरू झाली खऱ्याखुऱ्या आवडत्या भावगीतांची पर्वणीच श्री. देवांनी संगीतबद्ध केलेले व बाबूजींच्या स्वरातले “तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे” श्री.दिलीप पांढरपट्टे ह्यांच्या ‘घन बरसे’ मधील “आई असते शांत…..”कधी बहर- कधी शिशिर-” मागोमाग अजून एक छान गाणे- “काही बोलायचे आहे पण बोलणार नाही” ह्या गीताने श्रीधरने स्वत:च्या सहभागाचा समारोप केला.

श्रीधर फडके नंतर उत्तरा केळकरांनी अष्टपैलू गीतांचा गालिचाच रसिकांसमोर उलगडला. बहिणाबाईंच्या – यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेल्या – “जाय आता पंढरीले” ही ओवी व “खोप्या मंधी खोपा सुगरणीचा चांगला…..” ही ओवी सादर केली. विं दा करंदीकरांचे ४ वेगवेगळ्या चाली एकत्र असलेले “सर्वस्व तुजला वाहिले” ह्या कठीण भावगीतानंतर आली मऱ्हाट् मोळी लावणी….. “माघाची थंडी माघाची…..” ह्या लावणीला संयमीत पार्लेकरांनी शिट्ट्या व टाळ्यांनी सभागृह डोक्यावर उचलून घेतले व आपणही खरे ‘मऱ्हाटी’ असल्याचेच दाखवून दिले.
ज्या गीतांसाठी मी तासभर तर सोडाच,…. दिवसभर रांगेत उभे राहून प्रवेशिका मिळवण्यास तयार होतो त्या गायकाची मी उत्सुकतेने वाट पाहतं होतो. श्री.अरुण दाते ह्यांचे मंचावरील आगमन सर्वांनीच टाळ्यांच्या गजरांत केले. “मी पाहिले वाहिले व त्यानंतरही सर्वाधिक गाणी श्री. यशवंत देवांचीच म्हटली आहेत” असे संगत श्रीनिवास खळे ह्यांचे १९६३ मधले “शुक्रतारा मंदवारा” हे गीत यशवंत देवांनीच संगीतबद्ध केल्याची आठवण करून दिली. “कविता चांगली नसेल तर गीत कधीच अजरामर होत नाही व टिकून राहणार नाही” असे संगत त्यांनी श्री.यशवंत देवांची व समोर बसलेल्या आशा भोसलेंची स्तुती केली. आशा भोसलेला “फिट्ट” बसणारे गीत – “दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे” हे सादर केले. त्या पाठोपाठ सुरू केलेल्या “अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी- लाख चुका असतील केल्या; केली पण प्रीती” ह्या गीताला सुरुवातीलाच टाळ्यांचा कडकडाट झाला. “जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे, आपले आनंद गाणे गायचे आहे” ह्या देव व दाते ह्यांच्या येऊ घातलेल्या नव्याकोऱ्या भावगीता पाठोपाठ दोघांचे सर्वोत्कृष्ट व सुप्रसिद्ध “भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी” हे सादर झाले.
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या माझ्या आयुष्यातल्या सर्वांत आवडत्या गीताने श्री. दाते ह्यांनी ह्या संगीत समारंभाची सांगता केली हे माझे सुदैव !
त्यानंतर मध्यांतर झाले.

मध्यांतरानंतर श्री.यशवंत देव, सौ.करुणा देव, श्री.गजाननराव वाटवे व श्री.गजाननराव सुखटणकर ह्यांचा आशा भोसले ह्यांच्या हातून सत्कार करण्यात आला. मऱ्हाटमोळी पगडी देऊन श्री.यशवंत देवांवर छतातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

नंतर सुरू झाली आशा भोसलेंशी अनौपचारिक गप्पांची मैफील त्याचा सारांश –

आशा- मराठी बोलण्याची मला सवय थोडी कमी आहे कुठे चुकले तर मोठ्या मनाने क्षमा करा
आशा- खरे ब्राह्मण हे असे असतात (देवांकडे हात दाखवून) पगडी त्यांना अगदी शोभून दिसते- इतरांनी पगडी घातली तर ती चांगली दिसत नाही.
आशा- मला पगडी घालण्याची खूप इच्छा आहे पण कोणी घालतच नाही आता मी विश्वासला (हृदयेश आर्ट्स चे) सांगणार आहे तू नेहमी मला टोपी घालतोस पुढच्या कार्यक्रमाला मला पगडी हवी.
आशा-ग्रॅज्युएशनची टोपी घालण्याची मला खूप इच्छा होती पण मी फक्त ४थी ५वी शिकलेली – पण ही इच्छा एका गीताने पूरी केली व मला ग्रॅज्युएशनची टोपी घालायला मिळाली. ती टोपी घालूनच मी स्टेजवर गाणे म्हटले कारण भीती वाटत होती, त्यांनी ती परत दिलीच नाही तर ? 
देव- वाटव्यांवरील कविता वाचून दाखवत- वाटवे हे मराठी भावगीतांचे गेटवे आहेत.
आशा- वाटव्यांच्या भावगीत म्हटल्याने मी माईंच्या हातचा मार खाल्ला आहे (राधे कसा गं सैल झाला तुझा अंबाडा ह्या गीताचे ध्रुपद ऐकवून)
 आशा- (टीव्ही वरील मुलाखतकार बायकांच्या हुबेहूब नकला करून खूप हसवले.) ह्या मुलाखती घेणाऱ्यांनी त्या व्यक्तीचा फोटो ठेवून मुलाखत घेतली तरी चालेल अशा मुलाखती घेतात. 
आशा- आपण सर्वप्रथम केंव्हा भेटलो ह्याची आठवण करून दिली – परत एकदा “विसरशील खास मला दृष्टीआड होता” ह्या गीताचे एक कडवे दोघांनी सादर केले
आशा- फडके व देव हे दोघेही सारख्या ताकदीचे संगीतकार- ह्यांच्या बरोबर काम करायचे म्हणजे माझी मधल्या मध्ये पंचाईत व्हायची. फडके दाबून गाणारे तर देवांना मनमोकळे व आवाज न चोरता गाणे आवडायचे.
आशा-(बाबूजींची हुबेहूब नक्कल करीत) फडके असे गात – ह्या नंतर बाबूजींच्या आठवणी आशाने व्यक्त केल्या.
देवांनी ढगाला लागली कळ वर एक विडंबन(राजकारणावर)काव्य सादर केले “राजकारणात साचलाय मळ – त्याची भोगतोय फळ ”
ई-टीव्ही वर शिघ्रकाव्य बसल्या बसल्या केल्याची आठवण देवांनी सांगितली आम्ही मुलींशी बोलण्यासाठी महिनो न महिने घ्यायचो तर आजकालची मुले सरळ ‘आती क्या खंडाला’ असे म्हणतात हे साम्य रिमिक्स चे व जुन्या गीतांचे असल्याचे देवांनी सांगितले.
रिमिक्स मुळे बेरोजगारी कमी झाल्याचे श्री. देव उपहासाने म्हणाले- जेथे फक्त तबला पेटी व तंबोरा ह्या निवडक वाद्यांवर आम्ही गाणे ऐकवले आहे तेच गाणे आज १२/१५ पोरं वेगवेगळी वाद्ये वाजवत,कॅमेरा सोबत सादर करतात. संगीत श्रवणीय वरून प्रेक्षणीय झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
असतील नसतील (जास्त करून नसतील) तेव्हढे तोकडे कपडे घालून आजचे संगीत सादर केले जाते ह्याविषयी श्री. देवांनी खंत व्यक्त केली.
आशाच्या गायकीचे अमाप कौतुक श्री.देवांनी ह्यावेळी केले. स्वतःची एक शैली त्यांनी कायम ठेवल्याचे आवर्जून सांगितले. अनुकरण व अनुसरणं ह्यावर त्यांनी ह्या निमीत्ताने उदाहरण दिले. “जेवताना समोरचा काटा चमच्याने जेवतो म्हणून मी त्याचे बघून काट्या चमच्याने जेवलो ते अनुकरण पण मी माझ्याच ताटातले जेवलो ते अनुसरणं.”
देवांनी आशावर सुंदर कविता सादर केली.
आशा- “एका गाढवाच्या मालकाने पैज लावली होती की, ह्या गाढवाला मी नाही ह्या अर्थीचे काहीच शिकवले नाही तो प्रत्येक गोष्टीला होकारच देतो- मी ती पैज जिंकली… फक्त गाढवाच्या कानांत जाऊन विचारले की पॉप रिमिक्स गाऊ का व पैज जिंकली.”      
आशा-देवांनाः खर सांगा; दिदी व मी ह्यांत तुम्हाला कोणाचे गाणे जास्त आवडते ? 
देव- लताची गाणे म्हणण्यामागची आत्मीयता व ती स्वतःला वाटेल तेच गाते पण वाट्टेल ते गात नाही हे सांगितले
आशा- मला जे मिळेल ते गाणे मला म्हणावे लागले कारण माझी परिस्थिती तशी होती. मला मुले होती व त्यांच्या संगोपनाची व ग्रॅज्युएटच्या टोपीची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून जे समोर येईल ते गाणे मला घ्यावे व गावे लागले.
आशा- आजही गाण्याची मला गरज आहे कारण आज गाणे हा माझा श्वास आहे व मी स्वयंपाक करीत असतानाही गाणे गाते. गायल्या शिवाय मी जिवंत राहूच शकत नाही.  
श्री. देवांनी पाडगांवकरांची एक गमतीदार कविता सादर केली. “कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आले पिल्लू….”
त्यानंतर “संथ वाहते कृष्णामाई” वर एक विडंबन गीत त्यांनी सादर केले- “संथ गातसे कृष्णाबाई,गीतांमधल्या सुर तालांची जाणीव तीजला नाही” 
“मरण येणार म्हणून कोणी जगायचे थांबेल का ” हे पाडगांवकरांचे बोलगीत श्री. देवांनी सादर केले.
आशा- मी आपल्या ८५,९०,९५,१०० ह्या वाढदिवसांना येत जाईन 
देव- पंचवार्षीक योजना दिसतेय तुझी ! (हशां व टाळ्या) पण तोवर मी जगलो तर. 
आशा- माझे नांव आशा आहे हे विसरू नका !
ह्या संवादाबरोबर टाळ्यांच्या कडकडाटात ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.

अत्यंत घरगुती वातावरणांत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका विनामुल्य सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत उपलब्ध असल्याची जाहिरात वाचून मी ८ वाजता पोहचलो. जेमतेम दोन पत्रिका मीळाल्या, त्याही रांगेत तासभर वाट पाहिल्यावर !
पण असे कार्यक्रम बघायला मिळाल्यास दिवसभर रांगेत उभे राहण्याची तयारी आहे-

टिप्पणी करे

नोकरी – एक प्रवास

अभियांत्रिकी विद्यालयाची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्या झाल्या जळगांवला ओळखीने एका छोट्या इंजिनियरिंग फर्म मध्ये सर्व्हिस इंजि. ची तात्पुरती नोकरी मिळाली. बरोबरीचे बरेचसे मित्र मुंबईचे होते. त्यांनी परीक्षा झाल्या झाल्याच घरच्या वाटा धरलेल्या होत्या. भुसावळसारख्या गावात ‘टाईम्स’ दुपारच्या गाडीने येई. संध्याकाळी घरी जाताना रेल्वेच्या वाचनालयात जाऊन नोकरीच्या संधी चाळत बसायचा उद्योग मागे लागला! – एका महिन्यातच १०/१२ ठिकाणी दगड टाकले होते (खडे लहान वाटतात) त्यातले काही भिरभिरत लागले मुंबईतच व एका मुहूर्तावर, ४ दिवसांत येतो असा निरोप जळगांवला कळवून सटकलो !

जूनच्या २० ला एक मुलाखत होती…. ती यथातथाच गेली. जुलैच्या ५ ला दुसरी होती – मुंबई सेंट्रलला मराठा मंदिरच्या मागेच वाय.एम. सी.ए.च्या प्रशस्त कॉन्फ़रन्स हॉल मध्ये मुलाखतीला बोलावले होते. एक प्रेमळ आजोबां सारखा दिसणारा,मराठी बोलणारा पण मद्रासी माणूस; त्याच्या बाजूला एक जपानी माणूस व शेवटी त्या जपान्या इतकाच बुटका पण हिटलर टाइपच्या मिशा व चेहरा असलेला एक मानव म्हणण्यासारखा प्राणी बसलेला होता. माझी मुलाखत सुरू होण्या आधी एका टिपटाप दिसणाऱ्या तरूण व हसतमुख चेहऱ्याच्या मुलाने (मुलीने नाही…. दुर्दैव!) मुलाखतीला आलेल्यांचे स्वागत केले.

– मला एक समजत नाही; इंजिनियर्स चे व मुलींचे जन्मता वाकडे असते का ? महाविद्यालयात सगळीकडे रखरखीत वाळवंट… खाजगी महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यानंतर आमची प्रथम बॅच – आमच्या बॅचमधील ३ कोर्सना मिळून १९८ मुलांमागे फक्त ४ मूली – त्यातल्या दोघी अगदी बाळबोध वळणाच्या व लता मंगेशकर टाइप दोन वेण्या घालणाऱ्या. उरलेल्या दोघींपैकी एक बोदवड गावाहून, वेळ मिळाला की यायची…. ती तशी दिसायला बरी होती पण ड्फ्फर असावी…. पहिल्या वर्षी तिला मिळाला डच्चू; तो तीच्या वाडवडिलांना पचनी न पडल्याने तिचे नांवच काढून टाकले कॉलेजमधून – आम्हीही म्हटले जाऊ द्या – नाहीतरी आठवड्यातले दोन दिवस येणार त्यासाठी उरलेले ४ दिवस कोण डोकं पिकवेल ? चौथी होती केरळची -दिवसां दिसली असती उजेडात; मावळतीला कठीण परिस्थिती झाली असती- हे सर्व बघून महाविद्यालय म्हणजे हिरवळ व त्यावर बागडणारी फुलपाखरे हे समीकरण माझ्या गांवी कधीच नव्हते…… कॉलेजच्या एका बाजूला झेड.टी.एस. म्हणजे रेल्वेचे प्रशिक्षण केंद्र- दुसरीकडे आर.पी. डी. म्हणजे मिल्ट्रीवाल्यांचा कसलातरी डेपो. मागे विस्तीर्ण शेते व रेल्वे यार्ड तर चौथ्या बाजूला रेल्वेची खांडव्याला जाणारी रेल्वेलाइन-लाइन मारायची ती कोणावर हा एक प्रश्नच होता…असो..

    ‘विश्वनाथ’ नांव कळले त्या हसतमुख चेहऱ्याच्या मुलाचे – बघता क्षणी आवडेल असे व्यक्तिमत्त्व – त्याला बघून मुलाखतीचे दडपण जरा कमी झालेले. माझा स्वाक्षरी केलेला फॉर्म हातात पडल्यावर त्याने मराठीत काहीतरी विचारले – मग उरला सूरलेला फॉर्मलपणा नाहीसा झाला…. खाजगीत विचारावे अश्या सुरात ‘किती जण येऊन गेले’ हा प्रश्न भीत भीत (त्याला नाही – संख्येला) मी विचारला – ‘अजून चालू झाले नाहीत इंटरव्ह्यूज्’ ….. मी खूश ! आजूबाजूला काही हुशार काही ड्फ्फर चेहरे….एक-दोघे बोलबच्चन – ते सगळी कडून पिटून आलेले मोहरे असावेत-बोलण्यावरून दोनचार ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी नाकारल्याचे जाणवत होते. माझे टेन्शन परत वर जायला लागले – एकतर मराठी मीडियमचा पोऱ्या, त्यात भुसावळ सारख्या गांवातला ! नशीब ‘विश्वनाथ’ च्या जागी फाकडू पोरगी नव्हती नाही तर तिला इम्प्रेस करून करून त्यांनी माझ्यासारख्यांची फ्या..फ्या च उडवली असती.

विचारांच्या तंद्रीत असताना खांद्याला हलकासा स्पर्श जाणवला… तो मुलगा मला आंत जायला खुणावत होता…. धीरगंभीर चेहऱ्याने मी धीर न सोडता मध्ये गेलो. – ‘बस !’ आजोबा चक्क मराठीत बोलले ! पुढे एक एक करीत ‘हिटलर’ प्रश्न विचारत होता…… एकाही प्रश्नावर गाडी अडकली नव्हती व ‘कळीचा’ प्रश्न धाडकन समोर आला – ज्या प्रॉडक्ट्स मध्ये ती कंपनी काम करीत होती तिच्यावर आधारीत उत्पादने मी जळगांवला हाताळलेली होती. त्या प्रश्नाचे विचारपूर्वक उत्तर दिल्यावर ‘हिटलर’ जरा मवाळला…. “व्हेन वुड यू लाइक टू जॉईन ?” “टुडे ?” माझ्या उत्तरावर जपानी खळखळून हसला- “रहोगे कहाँ ?” हिट्लर ! “मामा है मेरा-वो पार्लामे रेहता है ।” बहुदा हिटलराला भारतातल्या पोरांच्या बेकारीचे प्रदर्शन जपान्यापुढे करायचे नसावे….. “ठीक है; बाहर जाकर बैठो !”……. मी बाहेर !

दोन चार पोरं मध्ये जाऊन फटाफट परत आली.. एक बोलबच्चन मध्ये गेला तो बराच वेळ अडकलेला होता…. दुसरा ‘विश्वनाथ’ वर फणफणायला लागला. मी ‘विश्वनाथ’ला ‘जरा जाऊन येतो’ म्हटलं व जिन्याकडे सरकलो “मी.कुळकर्णी; ह्या बाजूला-” करीत त्याने बाथरुमची वाट दाखवायचा प्रयत्न केला – पण माझ्या हातातले सिगारेटचे पाकीट त्याला दाखवत मी आलोच चा इशारा करीत सटकलो व दोन मिनिटांतच परतलो – दुसरा बोलबच्चन मध्ये होता. 

……थोड्या वेळाने विश्वनाथ मध्ये जाऊन आला… आल्यावर त्याच्या हातात एक व्हिजीटींग कार्ड होते. माझ्या हातात ते कार्ड कोंबून त्याने “उद्या ह्या पत्त्यावर सकाळी ९.३० ला या” असे मोघम सांगितले – कार्ड घेऊन मी रेंगाळतच खाली जायला निघालो….

नोकरी मिळाली की नाही हे कळलेलेच नव्हते! कार्डावर निळ्या अक्षरांत “जे. मित्रा & ब्र. प्रा.लि.”हा मुलाखत पत्रावरचाच ठसा व पी. सुब्रमण्यम – मॅनेजर ऍडमिनीसीस्ट्रेशन – हे नांव!! नांव, चेहरा व हुद्द्यावरून आजोबांचे हे कार्ड असावे असे ताडले. कवळी बिल्डिंग, एस.के.बोले रोड- दादर प.- बॉम्बे २८ असा पत्ता !!! संभ्रमातच मामीला काय उत्तर द्यायचे ह्याचा विचार करीत मी मुंबई सेंट्रल स्टेशन ची वाट धरली –
**********************************

गाडीत बसल्यावर अचानक ट्यूब पेटली – रिटर्न तिकीट आहेच तर दादरला उतरून जागा बघून घेऊ म्हणजे सकाळी गडबडीत उशीर झाला तरी शोधण्यात वेळ जाऊ नये. कबूतर खाना ते पोर्तुगीज चर्च च्या रस्त्यावर मधोमध ही बिल्डिंग असल्याचे विश्वनाथ बोलल्याचे आठवत होतं. चालतच शोध घेता घेता शेवटी एकदाची दुमजली इमारत सापडली – शुद्ध चाळं !….- आधी विश्वासच बसेना – आपण नोकरीची स्वप्न पाहतो तेंव्हा आपले कार्यालय, तेथील वातावरण, आजू बाजूचे वातावरण हे सगळे कसे चित्रासारखे डोळ्यासमोर उभे राहते- जो बँकेत नोकरीस लागतो त्याच्या नजरेसमोर बँकेचे चित्र, जो इस्पितळात नोकरी धरतो त्याच्या नजरेसमोर ते चित्र….. मी एखाद्या बऱ्यापैकी सर्व्हिस इंडस्ट्रीचे स्वप्न मनांत बाळगलेले होते. – पहिल्या मजल्यावर जाणारा जिना चढत – मनांत म्हटले, ‘अजून कुठे आपल्याला नक्की माहित आहे की, ह्याच कार्यालयात आपल्याला नोकरी करायचीय ?’ परत फिरलो….. घरी मामींनी विचारले ‘काय झाले ?”उद्या  2nd Interview घेतील बहुतेक.’ मी उगीचच भाव खाल्ला ! ‘दोनदोन-तीनतीन वेळा बोलावतात मेले, एकदा काय ते विचारून आटोपून टाकायचे !’ मामींचा सात्त्विक संताप उफाळून आला.

दुसऱ्या दिवशी कालचेच कपडे न घालता वेगळा ड्रेस चढवून मी निघालो. जागा पाहून ठेवलेली त्यामुळे प्रॉब्लेम झालाच नाही. गेल्यावर अजून एक धक्का….. जागेला टाळे ! मी कपाळावर हात मारला! शेजारची लहान मुले उघडी नागडी फिरत होती…. बायका मंडळींचा टिपीकल चाळीतल्या सारखा आरडा ओरडा चालू होता… मध्येच एक माणूस गॅलरीत येऊन पचकन खाली थुंकून परत घरात जायचा…. ज्या गाळ्यात हे ऑफिस (?) होते तो गाळा जिन्याला लागूनच होता; जिन्यावरून अर्ध्या चड्डीत वर-खाली करणारी काही पुरूष मंडळी अगदी नमुनेदार बेवडी दिसत होती…. तेव्हढ्यात ‘आजोबा’ आले. त्यांच्या तुरुतुरु चालीवरून त्यांना यायला उशीर झाला असावा हे कळतच होते. वर आल्या आल्या अगदी जुन्या ओळखीचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पसरले. चाव्यांचा एक जुडगा माझ्याकडे देत- व बंद दाराच्या शटर कडे बोट दाखवत त्यांनी मला कुलूप उघडण्याची खूण केली……. व माझ्या पहिल्या नोकरीचा प्रथम दिवस – दुकानासारखे दिसणारे ऑफिसचे शटर वर उघडून झाला !

तसे म्हटल्यास मी जळगांवला नोकरी वजा काम करीत होतोच; पण जेथे जायचो त्या गृहस्थांनी पगार वगैरे अश्या फॉर्मल गोष्टी कधी केल्याच नाहीत. रेल्वेचा पास काढून द्यायचे – अधून मधून खर्चाला पैसे द्यायचे; मन लावून काम शिकवायचे (हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते) व आपुलकीने वागायचे. ‘इंस्टकॉन इंजिनियर्स’ हे काही जळगावातले मोठं खटलं नव्हतं, पण माझ्या सारख्या कित्येक गरजूंना व्यवस्थित मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पुण्य त्यांनी पदरांत सामावून घेतलेले होते. ह्या दुकान वजा ऑफिसचे शटर वर करताना मला माहितही नव्हते की, जळगावात त्यांच्या कडे दुरुस्त केलेली काही इक्वीपमेंट्स माझ्या व्यावसायिक जीवनाची कवाडे सताड उघडी करतील.

सुब्रमण्यम साहेबांचे वय वाटत होते त्याहून बरेच कमी होते. हार्डली ४५चे ते गृहस्थ जरा पोक्त वाटत म्हणून मी मनांतल्या मनांत त्यांना आजोबा ठरवून मोकळा झालो होतो. गप्पा सुरू झाल्या…. श्री. सुब्रमण्यम साहेब दिल्लीला असत. माटुंग्यात त्यांचे आतापर्यंतचे आयुष्य गेलेले. विश्वनाथन हा त्यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा ! काही कामासाठी बाहेर गेलेला होता तो तासाभरात येणार होता. आधीचे ऑफिस वरळीला होते ते मित्रा साहेबांच्या जावयाने लाटले – म्हणून ही व्यवस्था तातडीने व तात्पुरती करावी लागलेली होती. हिटलरचे खरे नांव ‘पवन’ आहे व तोच माझा डायरेक्ट बॉस असणार होता – सर्व्हिस मॅनेजर ! मी मोठा आवंढा गिळला….. मनात म्हटले ह्या तुफानाचे नांव पवन कोणी ठेवले असावे ? माझ्या बरोबर अजून एकाची नियुक्ती झालेली होती – त्याचे नांव प्रसाद कुळकर्णी होते – तो येण्यातच होता….. विश्वनाथन वर तणफण करणारा दुसरा बोलबच्चन अवतरला- माहित नाही का….. पण ज्याच्याशी पहिल्या भेटीत माझे सुर जुळत नाहीत त्याच्याशी जन्मभर ते तसेच राहतात. आमच्या दोघांच्या नशिबाने त्याने दीड महिन्यातच कंपनी सोडली ! माझा पगार रुपये ९००/- ठरवण्यात आलेला होता – व ८ जुलैला मला प्रशिक्षणासाठी दिल्लीला प्रस्थान करायचे होते…… ह्या सगळ्या गप्पा मारीत सुब्रमण्यम साहेबांनी तीनदा चहा मागून प्यायले. चहाची गंमत तर न्यारीच होती… टेबलावरचा फोन उचलून ते चहावाल्याला फोन करीत – दहा मिनिटे झाल्यावर परत रिमाइंडर देत – तेंव्हा कुठे चहा येई. तोही स्टीलच्या वाटीत उपड्या ग्लास मध्ये – एकुलता एक. मला गंमत वाटली…. एक चहा – पिणारे सुरुवातीला आम्ही दोघे – नंतर २ चहा – तिघे ! मग ३ मध्ये विश्वनाथ आल्यावर चौघे…. ! पण फोन मात्र ७/८ गेले असतील….

मी व प्रसादने सुब्रमण्यम साहेबांकडूनच पैसे घेऊन मुंबई सेंट्रलला जाऊन राजधानीचे चेअर कारचे तिकीट काढले – तेथेच प्रसादने मला सांगून टाकले- ‘इथला सीन काही ठीक नाही;  मला नाही वाटत मी जास्त दिवस येथे टिकेन’ ‘मग तू त्यांना सांगत का नाहीस ?’ ‘अरे, मला दोन महिन्यांनी जरा बऱ्यापैकी जॉब मिळणार आहे. तोवर टाइम पास होईल’….. जेथे दात आहे तेथे चणे नाही व जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत !

दिल्लीला प्रथमच जात होतो. पटकन भुसावळला जाऊन उरलेले कपडे घेऊन यावे लागणार होते. विचार करायलाही उसंत मिळत नव्हती. दिल्लीला जायच्या आधी श्री. सुब्रमण्यम कडून प्रॉडक्ट्स ची काही माहिती मिळवली – थोडा अभ्यास केला व प्रशिक्षणासाठी दिल्लीला रवाना झालो….. रात्रभर चेअर कार मध्ये डोळ्याला डोळा लागलेला नव्हता….. एक जीवन – एक प्रवास सुरू केल्याची जाणीव मनात होती, हा प्रवास पूर्ण होईल की नाही त्याची धास्ती मनांत होती !

*************************************

आज जवळपास २० वर्षे झाली. हा अभ्यास, हा प्रवास अजूनही चालूच आहे…. मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या – नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला – नोकरीत काही गमतीदार घटना घडल्या, काही काळजाला घरे पाडणाऱ्या घटना !- कुठे अंगावर शहारे आणणारे अपघात झाले तर दर्शनासारखी पत्नी मिळाली….. नोकरीत सुरू केलेले हे व्यस्त जीवन कुठे जाऊन थांबेल, देव जाणे- पण नोकरीतला तो प्रवास मात्र मनांत कायम घर करून राहिलाय !

श्री. सुब्रमण्यम, श्री.पवन, मॅथ्यु, विशू, अब्राहम (माझा व्यवसाय भागीदार) मिलिंद जोशी इ. माझे जुने सहकारी आजही माझ्या ह्या प्रवासातले सहप्रवासी आहेत हे गेल्या जन्माचे ऋणानुबंध तर नव्हेत ?

टिप्पणी करे

आम्ही नवरे !

दसरा गेला एका भल्या सकाळी मी सौ. ला म्हटलेअग….आता छान पैकी थंडी पडायला सुरुवात होईल तर आपण दोघे सकाळचा फेरफटका मारायला जायचे काय?”
हो, मुलींनाही घेऊन जात जाऊ !” मी कपाळावर हात मारला (मनांतल्या मनात).
मुलींना पण ?” आश्चर्याने माझ्या जबड्याचा आकार माझ्या पोटाइतका वाढला.
त्या उठल्या शोधत बसल्या तर ?”
आपण त्यांना रात्री झोपायच्या आधीच समजावून सांगू की, आम्ही सकाळी फिरायला जाणार आहोत!” मी माझ्या पोटाने धरलेल्या बाळसाची काळजी करीत होतो.
हळूहळू विषयाने वळण घ्यायला सुरुवात केली….माझ्या रात्री उशीरा झोपण्याच्या सवयीवर गोष्ट येऊन ठेपण्यापूर्वीच मला विषयाला वेगळे वळण द्यावे लागणार होते. मी ठेवणीतला बाण भात्यातून बाहेर काढला. “जरा आरशांत बघ किती जाडी होत चालली आहेस ते
छानसं हसून वाकडी मान करून म्हणते कशीतूच तर म्हणतोस ना नवरा खायला घालतोय ते माहेरी कळायला हवे म्हणून ?”
आणी काय रे ? हे सर्व माझ्यासाठी चाललंय की स्वतः:साठी ?”
अग असं कसं म्हणतेस ? आपण दोघेही काय वेगळे आहोत का?” मी भावुक झाल्याचा अभिनय केला.
राहू दे आताथोडा अधिक सेंटी झालास तर रडायला बिडायला लागशील !”

एक दिवस विषय सुरू होता टीव्ही वरच्या वृत्त निवेदिकेचामृदुला जोशी माझी अगदी खास आवडती निवेदिकाती असली की, सर्वच बातम्या मी डोळ्याची पापणी हालवता बघत असतो.
कधी स्वयंपाक खोलीत काम करीत असताना तीच्या कानावर माझेअहाहापडले की ती समजते मृदुला जोशीच बातम्या वाचत असेल.
एकदा चुकून मी भलत्याच्या वेळीअहाहाकेले तर म्हणेडोके ठिकाणावर आहे ना आज ?”
तर विषय होता वृत्त निवेदिकांचा….. मी म्हटलं, “बघ ती कशी टिपटॉप राहते ?”
तिला पैसे मिळतात त्याचेमला द्यावे लागतील !” माझ्या मते ही अगदीच अरसिक होती.
ह्यात पैशांचा काय प्रश्न ?” पण पुढे उत्तर देण्याच्या मन:स्थितीत ती नव्हतीच.
मीही झोपलेल्या वाघिणीला जागे करून वाघ मुझे खा’ म्हणायला तयार नव्हतो.
माझे म्हणणे अगदी मनांवर वगैरे घेऊन (की माझ्याशी वितंडवाद नकोत म्हणून) तिने सामंजस्य करार केला. “आपण दोघेही बारीक होऊया, बस्स ?”
त्या दिवशी देवाचे सोडून तिचे पाय धरायची मला इच्छा झाली…. मी दिवसभर तिला माधुरी, मृदुला, मृणाल (कुळकर्णीच बरं का !) ह्याच्या बाराखडी वाल्या माझ्या आवडीच्या सर्वच्या सर्व नायिकांच्या जागी ठेवून स्वप्ने बघू लागलो.
दिवस कसाबसा गेला, रात्री जरा त्या मानाने जेवणं लवकर आटपून मी संगणक वगैरे कार्यक्रम बाजूला सारून लवकरच झोपायची तयारी करू लागलो. काही आठवणच नसल्याचा अभिनय करीत ती मला म्हणालीसकाळी कुठे ब्रेकडाउन कॉलवर लवकर जायचे आहे का
माझ्या अंगाचा अगदी तीळ तीळ पापडासारखा झाला…. 
दिवसभर कामाच्या रगाड्यात बिचारी विसरून गेली असेल असा सोज्वळ विचार करून मी तिला आठवण करून दिली-
अगं सकाळी आपण लवकर उठायचे ना, फिरायला जायला?”
ओह ! तुझे शूज काढावे लागतील वरूनत्यांची लेस तू आणणार होतास ती आणली का ?”
शाबास ! तू हे मला आता सांगतेस !”
म्हणजे आठवण करून दिली ती चूक माझीच !”
मी आपला जळफळत स्टुल घेऊन बाथरुमवरच्या माळ्यावर डब्बे शोधायला लागलो. एका खोक्यात धुरकट मळकट झालेले काळेपॉवरएकदाचे सापडले…. ‘
हुश्शकरीत खाली काढले, बघतो तर काय एकही नाडी धड नाही. मग ऑफिस शूजची नाडी काढून जेमतेम काम निभावून नेले. जरा नीट धड दिसावेत म्हणून त्यावर ब्रश वगैरे फिरवून बारीक व्हायच्या तयारीला लागलो.
सकाळी कितीचा गजर लावायचा ?” “साडे पाचाचामी निर्विकार पणे बोललो.
उठणार आहेस ना?” तिला विषयाचे माझ्या उत्साहाचे गांभीर्य माहीत नसावे !
म्हणजे काय ?”
म्हणजे उठणार आहेस ना गजर वाजल्यावर ? तर मलाही उठव
माझ्या बरोबर दहा वर्ष काढून आता ती माझ्या तालमीत चांगलीच तयार झालेली दिसत होती. मी कूस वळवून झोपण्याचे नाटक केले.
************
                                                  25-05-20051.gif
माधव, ऊठ…. उठतोयस ना? डॉ. शंकरनचा फोन आहे !”
हम्मगुड मॉर्निंग सर !” “अरे गुड मॉर्निंग काय ? ते येथे नाही आलेत, त्यांचा फोन आहेलवकर उठून घे !”
मी धडपडत उठलो. फोनवर कामापुरते बोलून भेटीची वेळ ठरवून आळोखे पिळोखे देत देव्हाऱ्या समोर येऊन उभा राहिलो खाडकन डोळे उघडलेबापरे चांगलेच उजाडलेय की, आपल्या फिरायला जाण्याचा बट्ट्या बोळ झाला.
हॉल मधलेपॉवरमला वाकुल्या दाखवत कोपऱ्यांत पहुडलेले होते. त्यांना उद्या सकाळपर्यंत उठवणारे कोणी नव्हते.तू मला उठवले का नाहीस सकाळी ?”
मी किती प्रयत्न केला तुला उठवायचा; तू ढिम्म हालतंच नव्हतास !”
दिनचर्या रोज प्रमाणे सुरू झाली. दुपारी एका क्लायंट कडे बसलो असता एक पेशंट आला….. “डॉक्टर साहेब पोट गच्च झाल्यासारखे वाटतेयतपासणीचे सर्व सोपस्कार पार पडल्यावरसकाळी जरा फिरायला जात जा !” डॉक्टर उत्तरले-
मला स्वतः:चा निश्चय आठवला….. बाहेर पडल्यावर मी तडक बुटाच्या नाड्यांचे चांगले चार जोड विकत घेतले.
बरं झालं, मुलींनाही कामाला येतीलनाहीतरी शाळेत लेस हरवूनच येतातगृहिणीची प्रतिक्रिया !
हो अर्ध्या अर्ध्या करून दिल्यास तर वर्ष भर पुरतीलम्हणूनच आणल्या आहेत.” मला कपाळावर हात नव्हे हातोडा मारावेसे वाटत होते.
सकाळी कितीला उठवायचे ?” रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या तिचा प्रश्न !
साडे पाचालामाझे तेच उत्तर !
नक्की ना ? “…….
म्हणजे काय (हे मनांतल्या मनात होते). मी परत कूस वळवून झोपण्याचे नाटक केले.
***********
डिंग डॉंगच्या गजराने मी डोळे किलकिले केले. आज मोबाईलचा गजर असा का वाजतोय हेच कळेना ! शेवटी कसाबसा धडपडत उठलो तेंव्हा कळले दरवाज्याची बेल वाजवतंय कोणीतरी. मी उठून देव्हाऱ्यावर नजर टाकून गडबडीत दार उघडले. दूधवाला वैतागून दारात उभा होता मी बाजूच्या डेस्कवर ठेवलेले भांडे पुढे करून दूध घेतले.
दूध स्वयंपाक खोलीतल्या कट्ट्यावर ठेवून खोलीत येऊन परत बिछान्यांत आडवा झालो. मुलींच्या खोलीत मुली गाढ झोपेत होत्या. दर्शना बहुतेक बाथरुम मध्ये असावी….. मला केंव्हा परत डोळा लागला कळलेच नाही.
उन्हे वर आली होती…. “चहा….” करीत मी उठलो. सरळ बाथरुम मध्ये जाऊन ब्रश करू लागलो.
हिचा चेहरा आज इतका टवटवीत कसा दिसतोय ?’ मी उगीचच बायकोच्या दिसण्यावर घसरलो. असो
चहा पीत पेपर वाचन करीत असताना मध्येच नजर रात्री काढून ठेवलेल्यापॉवरवर गेली. नव्या लेस छान दिसत होत्या. आजही ती जोडी मला वाकुल्या दाखवत होती.
सकाळी दूधवाला किती जोर जोरात बेल वाजवतोनाही?” …..हिने फक्त हुंकारानेच उत्तर दिले.
दिनक्रम सुरू झालापरत कुठेतरी एका क्षणी फिरायला जाण्याची आठवण झाली.
सकाळी उठवू का ?”
हो उद्या नक्की !” आज कूस वळवण्याची मला गरज वाटली नाही.
ती सकाळ काही उजाडलीच नाही.
माझ्या मोबाईलचा गजर बिचारा थकून गेला असावा असा विचार करून मी फिरायला जाण्याचा विषय बंद केला.
****************
मध्ये दहा बारा दिवस असेच गेले…..
एका सकाळी चक्क साडे सहाला मला जाग आली…..शेजारी सौ. दिसत नव्हती म्हणजे उठली असणारच.
चहा…..” करीत मी बाथरुम मध्ये घुसलो. दात घासून आल्यावर बाहेर येऊन बघतो तर सौ. चा पत्ताच नव्हता !
दार उघडले व बघतो तर काय, दूधवाल्याने आज (?) दूध प्लॅ.पि.मध्ये बाहेर ठेवलेले होते. पेपर उचलला व वाचन सुरु केले.
कुठे गेली होतीस ?” ती आल्यावर तिला विचारले.
फिरायला !”
म्हणजे ?”
म्हणजे रोजच्या सारखी फिरायला गेले होते !”
माझा माझ्या पोटाहून मोठा असल्याचा भास मला उगीचच झाला……
आज वाकुल्या दाखवायलापॉवरच्या जागी तिचे जोडे होते !
मित्रहो….. उद्यापासून मीही तिच्याबरोबर फिरायला नक्की जाणार आहे.
(
सकाळी उठलो तर !)                                cin1.jpg             

Comments (2)

एक पाढा नोकरीचा !

मराठी नोकरदार वर्गाचा एक पाढा-

नोकरी एके नोकरी…..

नोकरी दुणे बायको……..

नोकरी त्रीजे मुले………..

नोकरी चौके कर्ज…….

नोकरी पाचे घर…..

नोकरी सक स्कुटर…..

नोकरी साते नाटक…….

नोकरी आठे एफ.डी. …….

नोकरी नवे भांडण ……..

नोकरी दाहे नोकरी-

Comments (1)

“साहेब” !

दूरचित्रवाणीची ‘आजतक’ वाहिनी सुरू केली. नित्यनेमाप्रमाणे समोर जाहिराती बघताच टीव्हीचा आवाज बंद केला व मूक जाहिरातींचा आस्वाद घेता घेता जेवण सुरू केले…. इतक्यात ‘वाजपायी’ महोदय (अटलजी नाही, वृत्तनिवेदक !) आले म्हणून आवाज वाढवला- कोणत्यातरी नायका बद्दल ते काहीतरी बोलत होते. सचित्र निवेदन ऐकू आले, नायक म्हणजे श्रीमान दया नायक ह्यांच्याबद्दल सांगितले व दाखवले जात होते.

‘अब तक छप्पन्न’ चा खराखुरा ‘नायक’, दयाला त्या वाहिनीवरच्या चित्रफितीत रडताना पाहिले. सिनेमांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास ‘सब मगरमछ के आसू’ होते.

चहाच्या टपरीवर काम करणारा पोऱ्या, खूप मेहनतीने रात्रीचा दिवस करून शिकला व पोलीस खात्यात भरती झाला होता म्हणे….. साहजिकच जेंव्हा तो नवा ‘नायक’ झाला तेंव्हा मुंबईकरांना त्याचे कोण कौतुक वाटले. पेपरांत रकानेच्या रकाने भर-भरून वर्णने यायची. लोकल गाड्यांत हिरीरीने ‘मी दया नायकला कुठे बघितला आहे’ ते सांगितले जायचे. आमच्या इमारतीतला बोल-बच्चन कल्पेश तर त्याच्या ‘एन्कॉन्टर्स’ चे असे काही रसभरित वर्णन करायचा की, स्वतःच तेथले सगळे नुकतेच ‘आवरून’ आला आहे !

आज महारथी लाचार दिसत होते…. थोडा वेळ रडण्याचे नाट्य बघितल्यावर उबग आला म्हणून वाहिनी बदलली व पुढे सरकलो तर काय…. नानाचा ‘ अब तक ५६’ लागलेला होता. ‘त्या’ नाट्यापेक्षा ‘हे’ नाट्य बरे म्हणून तहान-भूक न विसरता व जेवता जेवता त्या सिनेमातले किलो किलोंचे भारी डायलॉग्स ऐकले ! पोट गच्च भरल्यावर मग कुठे डोकं चालायला लागले…..

वृत्तनिवेदकाने काही प्रश्न बघणाऱ्यांवर सोडलेले होते. माझ्या मनात विचार आला, आईच्या नावाने शाळा, बापाच्या नांवाने दवाखाने किंवा अमक्या ढमक्याच्या नांवे पाणपोया सुरू करणे व स्वतःची पापे त्या पुण्याच्या कल्पनेखाली दडपून टाकणे आजकाल किती सोपे झाले आहे ना !
एका भाईची माणसे टपकवायची व दुसऱ्या भाई कडून ‘चंदा’ गोळा करण्याचा ‘धंदा’ करायचा…
एखाद्या सिने नटाला/निर्मात्याला धमक्या आल्या (त्यातही स्वतःचा कार्यभाग असणारच !) की, त्याला संरक्षण देण्याच्या नावाने खंडणी वसूल करायची….
किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला (माणिकचंद/जोशी वगैरे) अटक झाली की “थर्ड डिग्री” लावू नये म्हणून खिरापती गोळ्या करायचा……   
इतके झाल्यावर ५०% मात्र ‘वर’ पोहचवायचे मग शाळा तर काय, मेडिकल कॉलेजही सुरू करता येईल की !

पण ज्या मातेच्या नावाने ही शाळा उघडली गेली आहे तिचे म्हणणे काय असावे ? अशा अप्रामाणिक पणे जमा केलेल्या ‘माये’ने उघडलेली त्या ‘माये’च्या नावाची शाळा शिक्षण ते काय देणार ? व हे ‘नायक’ साहेब मुलांच्या स्नेहसंमेलनाला तेथे गेल्यावर मुलांना उपदेश तरी काय करणार हे विचार मनांत आल्याशिवाय राहिले नाहीत.   

 दुसऱ्या एका ‘साहेबां’ना असेच एका वाहिनीवर बघितल्याची आठवण झाली. साहेबांच्या अंगात चक्क ‘राधे’ने प्रवेश केला होता व डी.आय.जी. साहेब कृष्णाच्या भक्तीत असे काही तल्लीन झाले होते की त्यांना स्वतःचे व नेसलेल्या साडीच्या पदराचेही भान उरले नव्हते.(पगार मात्र खात्यातून बरोबर काढून घ्यायचे-)…
एका चित्र वाहिनी वर दाखवलेल्या दृश्यात ह्या ‘साहेब’रुपी राधेला गोपीकांनी असे काही वेढून टाकलेले दाखवले होते की, खुद्द कृष्ण आला तर त्यालाही ‘साहेबां’चा हेवा वाटेल! साहेबांचे वागणे, चालणे, बोलणे ह्यावर राधेचा इतका प्रभाव पडलेला होता की, त्यांच्या सर्वांगावरून साहेब म्हणजे ‘राधे’चेच रुपडे आहे असेच कोणालाही वाटावे !
हातात बांगड्या….
डोळ्यांत कजरा…..केसांत गजरा…..
नाकात नथनी, डोईवरून ओढणी व कानांत डूल…. असे हे ‘साहेबां’चे साजीरे गोजिरे रुपडे प्रत्यक्ष ‘राधे’लाही ‘लाजवणारे’ होते !

ह्या ‘साहेबां’ना, सॉरी ‘राधे’ला, काही दिवसापूर्वी त्यांच्या अनुयायांनी रंगमंचावर स्थानापन्न केल्याचे चित्रीकरण बघण्यात आले. “कार्यक्रम” उरकल्यावर ‘राधे’चा ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली. “चारो तरफ कन्हैय्या – बीच में राधा” अशी उलटी अवस्था होती. त्यात बिचाऱ्या एका भक्ताचा ‘धक्का’ लागला राधेला !
धक्का नेमका चुकीच्या जागी, चांगलाच जोरदार लागला असावा ! बघता बघता राधेतला ‘साहेब’ जिवंत झाला….. व फाडकन् भक्ताच्या श्रीमुखांत भडकवली साहेबांनी ! भक्त महाशय बिचारे गोंधळले असावेत ‘आशीर्वाद’ मिळण्याऐवजी डायरेक्ट ‘प्रसाद’च खावा लागलेला होता !

साहेब पुनश्च ‘राधा’ झाले की नाही हे त्या गोंधळात वृत्तनिवेदक सांगायलाच विसरला (न जाणो आपल्यालाही ‘प्रसाद’ मिळेल ह्या भितीने !) परंतू एक मात्र चांगले झाले…. गर्दीत पुरुषांचे धक्के कसे खावे लागतात ते त्या ‘राधा’रुपी साहेबाला बरोबर कळले होते !

‘बिगर दॅन लाईफ’ असली प्रतिमा रंगवलेले आपले प्रतापी ‘साहेब’ लोक व त्यांच्या भोवती गोळा झालेले प्रशंसक/अनुयायी पाहिल्यावर आपणही ‘साहेब’ व्हावे असे एखाद्या हवालदाराला न वाटल्यास नवल ते काय ?

पोलीस खात्याचा ऱ्हास बघत दोघे भाई मात्र गालातल्या गालात हसत असावेत !

टिप्पणी करे

संवाद साधण्याच्या कला-

(विवेकानंद व्याख्यान मालांना मी पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघात ८९-९० साली हजेरी लावायचो. मांजरासारखी अनेक ठिकाणे बदलत असताना ह्या नोंदींची गायब झालेली वही गावी कचरा साफ करताना सापडली. ९० सालातले व्याख्यात्यांचे विचार आजच्या मॅनेजमेंट विषयाशी मेळ खात आहेत का ह्याचाच विचार करतोय ! जितके शक्य आहे ते सर्वच मुद्दे नोंदवहीतून विस्तृतपणे येथे देण्याचा प्रयत्न करेन. आपणही आपले विचार मांडल्यास इथल्या तरूण वर्गाला अधिक मार्गदर्शन होईल)  

काही व्यक्तींचे मुद्दे अचूक असतात फक्त ते मांडताना त्यांना इतकी घाई होते… किंवा ते उत्तेजित होतात की, त्यांच्या चांगल्या बाजूकडे दुर्लक्ष होऊन त्यांची वाईट बाजू समोर येते. काही काळ गेल्यावर त्यांच्या भोवतीच्या मंडळींना ते काय म्हणाले होते ते आठवते व त्यावेळी त्यांचे मुद्दे बरोबर असूनही ते मांडण्याची रीत चुकल्याने त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. परंतू तोवर वेळ निघून गेलेली असते.

नुकतेच घडलेले उदाहरण द्यायचेच झाल्यास-
“संजय दत्त हा अतिरेकी नाही, शस्त्रास्त्रे बाळगण्याचा मूर्खपणा त्याने केला असेल परंतू त्यासाठी त्याला सरसकट देशद्रोही ठरवण्याची गरज नाही-” इति बा.ठा. ही गोष्ट असेल १९९३ च्या बॉम्ब स्फोट खटल्यानंतरची. सुनील दत्तने अतोनात प्रयत्न करूनही तुरुंगातून सोडवू न शकलेल्या त्याच्या पुत्राला काँग्रेसने नव्हे तर ठाकरेंनी साथ दिली होती.
न्या. कोदे ह्यांचा कालचा निर्णय तेच दर्शवतो. फक्त साहेबांची सांगण्याची पद्धत वेगळी होती म्हणून राईचा पहाड केला गेला होता.
तीच गोष्ट पाकिस्तानाशी क्रीडा संबंध ठेवावेत की नाही ह्या बाबत !

ह्याच संदर्भात काही उदाहरणे अजून देता येतील. 
अभ्यासाच्या वेळी एक विद्यार्थी बागेत इकडे-तिकडे हिंडत होता. त्याला दुसऱ्या विद्यार्थ्याने विचारले, “तुला अभ्यासाच्या वेळेत इकडे-तिकडे हिंडण्याची परवानगी मिळाली ?” “हो” पहिला बोलला.
“पण मी विचारले असता, शिक्षक ‘नाही’ म्हणाले”.
“तू विचारले असशील, ‘अभ्यास करताना मी इकडे-तिकडे हिंडू का ?’ मी विचारले, ‘ इकडे-तिकडे हिंडत असताना मी अभ्यास करू शकतो का !”   

आपण काय बोलतो त्यापेक्षा ते कसे बोलतो हेही महत्त्वाचे असते.

एक मुलगा प्रथमच आपल्या मैत्रिणीला नृत्यासाठी घेऊन जाणार होता. त्याने आपल्या दुसऱ्या अनुभवी मित्राला सल्ला विचारला.
“तुम्हा दोघांना सुरुवातीला जरा अवघडल्यासारखे होईल, अस्वस्थता दूर करण्यासाठी मैत्रिणीची कोणत्या तरी चांगल्या गोष्टीबद्दल स्तुती कर !”
नृत्य करताना त्याला आपल्या अनुभवी मित्राचा सल्ला आठवला…..
“प्रिये, तुझ्यासारख्या लठ्ठ मुलीला नृत्य जमणार नाही असे मला वाटले होते परंतू तू फारच छान नाचतेस !”
पुढे काय झाले असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी !

पुण्यातल्या पाट्या जगप्रसिद्ध आहेत. एका चहाच्या दुकानात पाटी होती…..
“जे गिऱ्हाईक आपला उष्टा ग्लास फळीवर ठेवतील व सिगारेट ची रक्षा रक्षापात्रातच टाकतील त्यांच्याकडे मालक सुट्टे पैसे मागणार नाहीत”
अशीच युक्ती एका उंच इमारतीत केलेली होती. तेथे दोनच लिफ्ट्स होत्या व गर्दी फार होई. सतत तक्रार आल्यावर तिकडच्या सचिवाने लिफ्ट्स च्या भोवती पूर्ण उंचीचे आरसे लावले. स्वतःला आरशात न्याहाळताना लिफ्ट यायला वेळ  लागतो हे तक्रारदार विसरूनच गेलेत. मी स्वतः आमच्या इमारतीतला सूचना फलक लिफ्ट जवळ हालवला जेणेकरून “आम्हाला माहीतच नव्हते” चा सूर आपोआप कमी झाला.

काही वेळा नेमके काय सांगायचे आहे ते पानभर लेखनानेही वाचकाला कळणार नाही…..
काही वेळा मुलाकडे टाकलेला वडिलांचा फक्त एकच कटाक्ष बरेच काही सांगून जातो.

संवाद साधणे ही कला आहे असे म्हटले जाते.
माझ्या मते फक्त कलाच नाही तर ती एक मोठी प्रक्रिया आहे…. तो एक अनुभव पण आहे.
संवादात आशयाबरोबर उच्चार, भाषेची शुद्धता, लेखनाची सवय, वाचन करून आलेली प्रगल्भता व ग्रहण शक्ती, नेमक्या वेळी नेमके शब्द आठवण्या इतपत स्मरणशक्ती. वक्ता असल्यास नेमका हजरजवाबी पणा, समोरच्यावर झालेला परिणाम ग्रहण करण्याची कला (फिडबॅक ग्रास्पींग पॉवर) ह्या क्वॉलीटीज् (मराठी शब्द ?) यायला पाहिजेत.
छोटीसी जांभई किंवा (विलासराव देशमुख झोपले होते तशी) एखादी ‘नॅप’ श्रोत्याला बरेच काही सुचवते.
मनोहर जोशींना माझ्या मुलींच्या शाळेत भाषण देताना ऐकले होते. त्यांचे भाषण इतके खुसखुशीत होते की हसून हसून मुरकुंड्या वळल्या. विषय राजकारणाचा नव्हता व फक्त शिक्षणाचा होता हे सर्वात महत्त्वाचे.

संवादासाठी समोर असलेले माध्यम काय ते संवाद साधण्यापूर्वी समजावून घेणे नेहमीच चांगले. नोकरीच्या मुलाखतीला जाताना सिनेमाला जायचे ते कपडे घालून जाणे किंवा एखाद्या मित्राशी बोलावे तसे… “या मॅन आ कॅन डू दॅ” सारखी भाषा वापरल्यास कल्याणच होणार !
स्वतःचा पूर्वानुभव हे मोठे परिणामकारक हत्यार आहे; ते संवाद साधताना नेहमी वापरावे. लिंग, बौद्धिक/शैक्षणिक क्षमता, सामाजिक दर्जा व राहणीमान हे काही महत्त्वाचे घटक नक्कीच लक्षात ठेवावेत.  
काही महत्त्वाच्या मुलाखतींना जाताना तोंडात कुठलीही वस्तू चघळणे टाळावे. शक्य असल्यास परफ्यूम किंवा सौम्य अत्तराचा यथायोग्य वापर करावा. बोलण्याची पद्धत विनम्र व आवाज स्वतःच्या ताब्यात असावा. संवादात भावनिक आव्हानांपेक्षा वस्तुनिष्ठता असावी. संवाद आटोपशीर (पाल्हाळ न लावणारा) असावा पण म्हणून त्रोटक किंवा उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत.
समोरची व्यक्ती विचारत असलेले प्रश्न किंवा सांगत असलेली गोष्ट माहीत असली तरी पूर्ण ऐकून घ्यावी. लक्ष देणे ही देखील एक कला आहे. आपली मते वेगळी असल्यास सकारण व सादोहरण पटवून द्यायला कचरू नये परंतू वाद विवाद टाळावेत. गीव्ह & गेट हे तत्त्व लक्षात ठेवावे.
लक्ष दिल्यास मिळेल…..
मित्रता दिल्यास मिळेल..
मान दिल्यास मिळेल…..   
*******************************
राजू परुळेकरांचा “इ” टिव्ही वरील “संवाद” हा मी अधून मधून बघत असलेला एक दाद देण्यायोग्य कार्यक्रम आहे.
एकतर मी दूरदर्शन वरचे कार्यक्रम फारच मोजके बघतो त्यात जो एकदा बघतो; तो फिरून बघीनच ह्याची शाश्वती कधीच नसते !
ह्या गृहस्थाचे व्यक्तित्व मला अत्यंत आवडले. त्याचे एक कारण म्हणजे ओढून ताणून न साधलेला संवाद ! सहजरित्या व मनापासून/ हृदयातून जो खरा “संवाद” घडतो तो दर्शकांपर्यंत पोहचवण्याचे अनोखे कार्य हा गृहस्थ कित्येक भागांपासून चोख निभावतो आहे.
विषयावरील ज्ञानाच्या स्वत:च्या व समोरच्या व्यक्तीच्या मर्यादा उत्तम रितीने जाणून त्यावर सहजगत्या संवाद साधणारी त्याची कला बघून मी नेहमीच अचंबीत होतो. वयाच्या मर्यादा, व्यक्तिमत्वाच्या मर्यादा, लिंग-जात-भाव-जाण ह्यावरील कुठल्याही मर्यादा परुळेकरांच्या आसपासही फिरकत नसाव्यात. अस्खलीत बोललेले मराठी, व्यवस्थित कळणारे शब्दोच्चार, समोरील व्यक्ती ज्या विषयांत तज्ञ आहे त्यावरच विचारलेले समर्पक प्रश्न, समोरील व्यक्ती काय सांगते आहे ते थंड चित्ताने आपल्यात समावून घेण्याची कला, त्याच थंड डोक्याने दिलेले त्यावरील प्रतिसाद व हावभावात्मक प्रोत्साहन हे सर्वच टिप कागदाने टिपून घेण्यालायक आहे.

आपण असंख्य व्यक्तिमत्वे आपल्या रोजच्या दैनंदिनीपासून ते दुरदर्शनच्या कित्येक कार्यक्रमांतून नेहमीच बघत असतो. मराठीतला सा रे ग म प हा कार्यक्रम बघताना आपल्यापैकी कोणास पल्लवीचा अवखळपणा; किंवा अवधूतचा उस्फुर्तपणा किंवा देवकींचा धिरगंभीर सल्ला आवडत असेल…. कोणास मिलींद गुणाजीचे भटकंतीवर केलेले समालोचन आवडत असेल….. सुनिल गावस्करचे शब्दोच्चार व परखडपणा कोणास भावत असेल, तर के बि सी तला अमिताभचा मिश्कील “लॉक किया जाय ?” कोणास आवर्जून सांगावासा वाटेल….. परंतू ह्या सर्वच संवाद साधण्यांच्या कलेतून एकच गोष्ट प्रकर्शाने जाणवते व ती म्हणजे जर आपण आपल्या हावभावांमधून व आपल्या देहबोलीतून सहजसाध्यपणे समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू शकलात तर तो फक्त एक संवादच न उरता नक्कीच सुसंवाद होईल.

राजू परुळेकरांची अजून एक खास नोंद घेण्यालायक गोष्ट म्हणजे विषयावर केलेला त्यांचा अभ्यास…. आपण जी मुलाखत घेणार आहोत किंवा आपण जी मुलाखत देणार आहोत ती देताना/घेताना आपल्या समोरील व्यक्तीचे त्या विषयात कितपत ज्ञान आहे त्याची उत्कृष्ठ जाण परूळेकरांना आहे. ह्यासोबतच स्वत:च्या मर्यादा जाणून केलेले विषयावरील वक्तव्य हे नोंद घेण्यालायक असते. माणसाने अज्ञान प्रकट करू नये परंतू नसलेले ज्ञान प्रकट करण्याचा प्रयत्नही करू नये.

आपण विचारत असलेले प्रश्न समोरच्या व्यक्तीला कितपत आवडतील ह्यांची जाण त्यांच्या प्रश्नांतून लगेच कळते. आजवरच्या कार्यक्रमांत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना एकाही मुलाखतकाराने उद्धट किंवा विषयाला सोडून उत्तर दिलेले मी बघीतलेले नाही. फक्त इतकेच नाही तर त्यांचा पोषाख हा मुलाखत देणाऱ्याच्या विषयाशी निगडीत असतो हे माझे अवलोकन आहे. गायकाची/कलाकाराची मुलाखत घेताना किंवा वैद्यकिय पेशातल्या व्यक्तीची मुलाखत घेताना घारण केलेला पोषाख हा वातावरण निर्मीतीत अधिकच भर घालतो. त्यांनी निवड केलेले प्रश्नही मुलाखतकाराच्या आवडीचे असेच असतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांतून नेमका आशय ‘काढून’ घेण्याची हातोटी वाखाणण्यालायक आहे.

आपण एखद्या विषयावर / नोकरीसाठी मुलाखत देताना आपल्या देहबोलीतून किंवा चेहऱ्यावर कोणते सहाजीक भाव आणल्यास मुलाखत कर्ता आपल्या बाजूने निकाल देईल ह्याचे बारकाईने निरीक्षण करावयाचे झाल्यास तरूण मंडळींनी हा कार्यक्रम एकदा तरी बघावा.
ज्यांना व्यवसायाच्या निमीत्ताने इतर व्यावसायीकांशी भेटी गाठी घ्याव्या लागतात किंवा तरूण मंडळींच्या मुलाखती घ्याव्या लागतात त्यांनी तर हा कार्यक्रम आवर्जून बघावा.
आजच्या युवकांनी मुलाखत देताना व मुलाखत कर्त्यांनी मुलाखती घेतांना कसा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा ह्याचे श्री. राजू परूळेकर हे उत्तम उदाहरण आहे.

एकणे किंवा लक्ष देणे ही अत्यंत महत्त्वाची कला आहे. लक्ष कसे द्यावे ह्याचे योग्य शिक्षण आपण कधीच घेत नाही. वर्गात प्राध्यापक शिकवत असता लक्ष द्यावे की नोट्स (नोंदी) घ्याव्यात ह्या कात्रीत आपले विद्यार्थी अडकतात असे वाटते. नोंदी घ्याव्यात तर विषय नीट समजलेला नसतो व विषयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केल्यास नोट्स काढण्याचे महत्त्वाचे कार्य राहून जाते…..
लक्ष देणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिये सारखी क्रिया असून प्रयत्नांनी व वेळ पडल्यास प्रशिक्षणाने त्याची खोली वाढवता येते. त्यासाठी काय करावे ते थोडे “लक्ष” देऊन बघा-
एकणे- कित्येकदा आपण काही गोष्टी जुन्या / त्याच त्याच व्किंवा निरूपयोगी आहेत असे समजून आपण कानाआड करतो, त्यामुळे “न ऐकण्याची” सवय जडून जाते. मग माझ्यासारखा एखादा संगणकावर गप्पा मारण्यात गुंतला की, सौ. पटकन नविन ड्रेस किंवा साडीचे प्रॉमीस कधी घेऊन निघून जाते तेही कळत नाही…… ह्यातला गंमतीचा भाग सोडल्यास आपण प्रत्येक कथना कडे किंवा जे आपण ऐकत आहोत त्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवल्यास फारतर आपला थोडासा वेळ वाया जाईल परंतू दुर्लक्ष करण्याची सवय जडणार नाही व त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी योग्य जागी पोहचून त्यावर लगेच उपाययोजना करता येईल.  

आशय – एखाद्या वक्त्याचे किंवा व्यक्तिचे मुद्दे काही वेळा चांगले असतात परंतू त्याला ते व्यक्त करता येत नसतात किंवा ते व्यक्त करण्याची त्याची पद्धत आपणांस आवडती नसावी परंतू चांगले लक्ष देणारा विद्यार्थि त्याच्या आशयाकडे लक्ष देतो व अभिव्यक्तिकडे दुर्लक्ष ! मागच्या भागात मी बाळासाहेबांबद्दलचे – पाकिस्तानाशी संबंध ठेवण्याबाबतचे (तो वेगळा चर्चेचा मुद्दा असावा)उदाहरण दिले होते ते आठवल्यास मला नेमके काय म्हणायचे आहे ते आपणांस कळेल. एखाद्या विषयाची मध्यवर्ती कल्पना (आशय) हा समजल्यास त्यातल्या घटने कडे केवळ घटना ह्या दृष्टीने न बघता त्याच्यातली जोडणी शोधण्याचा प्रयत्न करावा. ह्यामुळे आपल्या विचारकल्पनेस वेग येऊन जास्तीत जास्त गोष्टी आपण स्वत:त समावून घेऊ शकतो.  

आकलन व मूल्यमापन-  ज्याला चांगले लक्षपुर्वक ऐकता येत नाही, तो सर्व नीट ऐकण्याच्या आतच त्याचे मूल्यमापनास सुरूवात करतो. वक्त्याला काय व कुठे प्रश्न विचारावयाचे आहेत त्याची तयारी तो आकलन होण्याच्या आधीच करतो.
सुप्रसिद्ध वकिल श्री. उज्ज्वल निकम ह्यांना पत्रकारांना उत्तरे देताना बघून जाणवते की, हा गृहस्थ जर पत्रकारांच्या प्रश्नांचे इतके व्यवस्थित आकलन करत असेल तर बचाव पक्षाच्या वकिलांचे संभाषण किती खोलात जाऊन व लक्षपूर्वक ऐकत असेल….

एकाग्रता- अर्थातच एकाग्रता असल्याखेरीज ऐकलेली गोष्ट आचरणांत आणण्यास जड जाईल. मन चंचलतेने इतरत्र भटकत असल्यास मनाचा, व इतर इंद्रियांचा (महत्त्वाचे म्हणजे स्मरणशक्तीचा) ताळमेळ साधता येणारच नाही. मन एकाग्रतेने एकाच जागेवर स्थिर ठेवल्यास कुठलीही गोष्ट सहजसाध्य असते.
सुनिल गावस्कर किंवा हल्ली तेंडूलकर ह्यांची फलंदाजी हे ह्याबाबतचे उदाहरण नोंद करण्यालायक आहे. जेव्हा गोलंदाजा मागच्या साइटस्क्रिन (पार्श्वपडद्या)समोर काही हालचाली घडत असल्यास त्यांची एकाग्रता भंग झाल्याने पुढच्याच चेंडूवर त्यांना बाद होताना बऱ्याच वेळा बघीतलेले आहे.

विचार व उच्चार – उच्चारांचा वेग विचाराच्या वेगांच्या एक चतुर्थांश असतो. एका मिनीटांत आपण जीतके शब्द उच्चारू शकतो त्याच्या चौपटीने त्यावर विचार करतो. ह्या वेगाच्या फरकात वक्ता पुढे काय बोलणार आहे ह्याबद्दल अंदाज किंवा अटकळ बांधण्याचा प्रयत्न करावा. आपले अंदाज बरोबर असल्यास आपला विचार बरोबर आहे असे समजावे व अंदाज चुकल्यास विरोध व साम्य ह्याची तुलना करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
उत्तम रितीने लक्ष देताना दुसऱ्याच्या जागी स्वत:ला कल्पून लक्ष देणे (एम्पॅथी) हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आपल्याला वक्त्याचे म्हणणे मान्य करावेच लागेल ह्या भीतीने सांगणाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यातले महत्त्वाचे आशय कानाआड जातील.

नीट लक्ष देण्यामुळे आपले वैयक्तिक संबध सुधारतात. दुसऱ्याला/समोरच्याला आपण समजावून घेऊ शकतो. जसे वाचणे म्हणजे नुसते डोळे फिरवणे नव्हे तसेच लक्ष देणे म्हणजे नुसते कान उघडे ठेवणे नाही….. “नळी फुंकली सोनारे; इकडून तिकडून गेले वारे” अशी म्हण ह्यामुळेच पडली असावी. पूर्ण क्रियाशील मनच व्यवस्थित लक्षपूर्वक एकू शकते.
केवळ शब्दांना महत्त्व नसते- आवाजातले चढ-ऊतार, स्वरांची तीव्रता, भावना, चेहऱ्यावरचे हावभाव, अंग/देहबोली ह्या सर्वांचे नीट काळजी पूर्वक अवलोकन करणे म्हणजे लक्ष देणे. श्रवण करणे म्हणजे केवळ ऐकणे नव्हे तर त्यात नियोजन, कृतीशिलता, एकाग्रता, हेतू, ग्रहणक्षमता इत्यादी अनेक बाबी एकत्रीत असतात.

जे आद्न्या पाळतात त्यांच्याच आद्न्या व्यवस्थित पाळल्या जातात….
जो उत्तम लक्ष देतो तोच आपले म्हणणे दुसऱ्याला समजावून देऊ शकतो….
ज्या तऱ्हेने आपण लोकांशी बोलतो त्याच तऱ्हेने लोक त्याचे उत्तरे देतात……

मित्रहो, चांगले लक्षपूर्वक एकण्याच्या कलेने आपल्यात बरेच गुण एकत्रीत नांदू शकतात व अनेक अवगुणांवर मात करता येते हेच सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

टिप्पणी करे

ह्या साहित्यिकांना सलाम !

एका वृत्तपत्राच्या पुरवणी मध्ये नुकतेच ट्रकच्या मागील काही मजेदार वाक्यांचा संग्रह वाचण्यात आला आणी अचानक मी वाचलेल्या काही वाक्यांची आठवण आली. काही वाक्ये त्या लेखांत होतीकाही मी पाहिलेली आठवतातत्यांचीच सरमिसळ आज मनोगतींसाठी…..* ही खूण केलेला संदेश त्या वृत्तपत्रातला आहे.
***********************************

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते तर कधी पांचट पणाचा कळस असते…..
काहीही असो, नवनवीन कल्पनाविविध शेरोशायरीने भरपूर असे हे साहित्य हिंदीतच असतेकारण ट्रक (त्यांच्या भाषेत लाइनवरचा !) भारतभर फिरतो. पंजाबचा ट्रक गुजरातेत तर आसामचा कर्नाटकात बघायला मिळणे नावीन्यपूर्ण नाहीच !
ट्रकवर काय काय शेर लिहिलेले असतात ते त्यांच्या मागे गाडी वा दुचाकी चालवताना वाचता येते
लहानपणी समोरून रिक्शा आली की तीच्या मागे काय लिहिले आहे हे ओळखण्याचा आमचा एक खेळ होता.
एका रिक्शाच्या मागे-“आलोच हं !” असे लिहिले होते ते वाचून मालकाच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागेल…. घेतलेले भाडे सोडून येतोच तुम्हाला न्यायला हे एका शब्दात योग्य तो परिणाम साधणारे होते.
असेच एक वाक्य रिक्शाच्याच मागे होते…. ‘येता की जाऊ ?’
एकीच्या मागे लिहिले होते…. “तुमने दि आवाज और मै गया !”

कित्येक सरकारी फतव्यांमध्ये वाहनांच्या मागे बोधपर संदेश लिहिणे सक्तीचे आहे. “दो या तीन बस्स !” चे आजएक मूल सुंदर फुलझाले आहे.
शिकेल तो टिकेलमुलींच्या शिक्षणा वरीलमुलगी शिकली प्रगती झालीते बाल मजुरी विरोधी बरीच वाक्ये वाहनांच्या पाठी दिसतात.
.रा... च्या एका बसवरतुम्ही वाहून नेता केळी नी कणसं; आम्ही मात्र लाख मोलाची माणसं !” असे लिहिल्याचे मला आठवते.
ह्याने लोकजागृती होते की नाही हा वेगळा वादाचा विषय असू शकेल पण मला एक चाळाच आहे कुठलाही ट्रक दिसला रे दिसला की त्याच्या मागचाडायलॉगवाचायचामग कधी कोणी बरोबर असले की बरोबरीने त्याचा आस्वाद घ्यायचा नाहीतर एकटेच मनांत दाद द्यायची……. आता ट्रक च्या पाठी लागू ……..

काही किलो किलोचे भारी शेर सांगतो…..हिंदीत लिहावेच लागणार म्हणून माफ करा हं !
मेरा भारत महानहे वाक्य बहुदा सर्व ट्रकवर असायचेच ! जेंव्हा हे वाक्य लिहिण्याची सक्ती ( होय सक्ती ! ) रिकामं टेकड्या ऑफिसर्स कडून (आर.टी..) झाली तेंव्हा तो स्व. राजीव गांधींचा फतवा असल्याचे ऐकीवात होते…..
पुढेमेरा भारत महानवर कित्येक जोक्स तयार झाले पण आजही ते वाक्य प्रत्येक ट्रकच्या मागे हमखास असते. त्यावरचा एक भारी शेर ……

*                  दिवाली मेया अली‘ ~ मुहर्रम मे राम…..
                  इसलिये तो कहते है ~ मेरा भारत महान !
दिवाली, अली, राम, मुहर्रम ह्यांचा अर्थाअर्थी काय संबंध ?
पण अडाणी ट्रकवाल्याच्या भावना हिंदू मुस्लिम ऐक्याच्या होत्या त्याचे कौतुक जास्त वाटले. ह्या सर्वांचा देशाशी संबंध जोडून त्याने स्वतः:चे देशप्रेम ह्या रीतीने दाखवून दिले.

ट्रकची
मागची बाजू वेगवेगळ्या रंगबिरंगी कथनांनी सजवलेली एका गड्डीच्या मागे लिहिलेले होते ते वाचून ..मु.वळली.-
देखता क्या है ? मेरा पिछवाडा तेरे पिछवाडे से रंगीन है !” आता बोला !

ट्रकचालक
नेहमीच दारुडे असतात हा समज एकाला पचलेला नव्हता. त्याने स्वतः:च्या ट्रकच्या मागे लिहिलेले
तितलियॉं रस पिती है, भवरें बदनाम होते है
दुनिया शराब पिती है; ‘डिरायवरबदनाम होते है

*काही आकड्यांचे खेळ-
१३ मेरा ७, 
मेड 4 U,
(हृदयाचे चित्र) २०,१३,८०,२०,१३.-
म्हणजे पंजाबीत दिल वी तेरे अस्सी वी तेरे (हृदय पण तुझेच मीही तुझाच).
एक नमुनाहौरन बजाओ शौक सेसाइड दुंगा अगली चौकसे
तर काही काही स्पष्टवक्ते असतातजगह मिलने पर साईड दिया जायेगा “*
एकाने तरपंगा मत लेना ~ मेहंगा पडेगा अशी वॉर्नींगही मागे लिहिलेली….
एका वर लिहिलेलेनेकी कर जुते (बुटाचे चित्र) खा मैने खाये तू भी खा “*
मालिक की मेहनत, डिरायवर का पसिना….
देखो शानसे चली कैसी ये हसीना मालकाला मस्का
सेठ बडा दिलदार है पर चमचोंसे परेशान है असे आपल्या मालकाबद्दलचे वाक्यही वाचायला मिळेल….

स्वतःच्या गावाची ख्याती भारतभर पसरवणारा एक संदेश….
निम का पेड चंदन से क्या कम है ?
मेरा गांवअंबालालंडनसे क्या कम है ?”*

बॉर्डर सिनेमा आल्या नंतरघर कब आओगेह्या वर बरीच कवने वाचली आहेत (नेमकी आजच आठवणार नाहीत.) गुढघ्यांत मान घालून बसलेल्या एका युवतीच्या चित्रा बरोबर एक कवन लिहिले होते…….
मेरी जान मेरा इंतजार मत करना
मै मुसाफिर हूं मेरी राह मत ताकना

महिनों महिने घरा बाहेर राहणाऱ्या ह्या ट्रक ड्रायव्हर्सचे जीवन खडतर असतेच वर जीवाचा धोका,
घराची/कुटूंबाची काळजी,
मुलाबाळांच्या शिक्षणा कडील स्वतःचे दुर्लक्ष तसेच भविष्याची चिंता ह्या सर्व विषयांपासून वेगळा असा विचार आपल्या ट्रकच्या मागे लिहून आपल्या सारख्यांचे मनोरंजन करणाया ह्या साहित्यीकांना मनोमनसलाम !”

Comments (2)

Older Posts »